अमिताभ बच्चन हे अत्यंत लोकप्रिय अभिनेते आहेत.  

सध्या ते 'कौन बनेगा करोडपती' या शोमुळं चर्चेत असतात. 

अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावरही सक्रिय असतात.

परंतु बच्चन हे सध्या त्यांनी नवीन मालमत्ता खरेदी केल्यामुळं चर्चेत आले आहेत.  

त्यांनी मुंबईतील फोर बंगले परिसरात नवीन घर खरेदी केलं आहे.   

हे घर पार्थेनाॅन इमारतीच्या 31 व्या मजल्यावर आहे. 

त्यांनी हा संपूर्ण मजलाच खरेदी केला आहे. 

या मालमत्तेची किंमत तब्बल 31 कोटी रूपये आहे.