परळीमध्ये एका गणेश मंडळानं अमृता खानविलकरचा लावणीचा कार्यक्रम ठेवला होता.    

हा कार्यक्रम झाल्यानंतर अनेकांनी या मंडळावर टीका केली. 

यावर अमृता म्हणाली, लावणी ही महाराष्ट्राची ओळख आहे.

लावणीला खालच्या नजरेनं पाहणं पाप आहे, लावणीचा आदर करायला शिका.

 लावणी ही शृंगारक असली तरी धार्मिक आहे, असं मला वाटतं.

 एखाद्या स्त्रीनं श्रृंगार कसा सादर करायचा, याचं एक जागतं उदाहरण लावणी आहे.

 तसंच लावणीच्या कार्यक्रमांना नाव ठेवू नये, अशी विनंतीही तिनं केली आहे.