अक्षय कुमार आणि ट्विंकल हे दोघांची जोडी लोकप्रिय आहे.

लग्नाला इतके वर्ष होऊनही त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे.

परंतु नुकतंच अक्षयनं ट्विंकल आपल्या कुटुंबापासून दूर राहणार असल्याचं सांगितलं आहे.

कारण ट्विंकलनं फिक्शन रायटिंगमध्ये मास्टर डिग्री पूर्ण करण्यासाठी यूनिव्हर्सिटीत ऑफ लंडनमध्ये प्रवेश घेतला आहे.

 ही डिग्री पूर्ण करण्यासाठी ट्विंकल लंडनलाच राहणार आहे.

 अक्षय नुकताच आपल्या पत्नी आणि मुलांसह लंडनला गेला आहे.

 परंतु अक्षय काही काळ लंडनमध्ये घालवून मुलांसह परत येणार आहे.

 पण ट्विंकल मात्र तिची डिग्री पूर्ण करण्यास तिथंच थांबणार आहे. त्यामुळं अक्षय ट्विंकला एकमेकांपासून दूर रहावे लागणार आहे.