अभिनेत्री कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळं सतत चर्चेत असते.   

कंगनानं नुकतंच 'कर्तव्य पथाच्या' उद्घाटन सोहळ्यात सहभागी होण्यापूर्वी  मीडियाशी संवाद साधला. 

कंगना म्हणाली, आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय ते, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि वीर सावरकरांसारख्या अनेक क्रांतिकारकांमुळे.  

आपल्याल स्वातंत्र्य मागून मिळालं नाही, ते अनेक लढ्यांतून मिळालं आहे. 

तसेच मीडियानं विचारलेल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना म्हणाली, 

मी गांधीवादी नाही, मी नेताजी सुभाषचंद्र बोसवादी आहे.