अमिताभ यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते तरसत असतात.

आता त्यांचे चाहते असलेल्या कुंटुंबानं तर कमालच केली आहे.

 अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय कुटुंबानं अमिताभ यांची मूर्ती त्यांच्या अंगणात स्थापन केली आहे. 

या मूर्तीची किंमत साठ लाख रूपये आहे. ही मूर्ती राजस्थानमध्ये तयार केलेली आहे.

या कुटुंबाने अमिताभ यांना या मूर्तीबद्दल माहित आहे असं सांगितलं. तसेच आपण या सन्मासाठी पात्र नाही, असं अमिताभ म्हणाले आहेत, असंही या कुटुंबियांनी  सांगितलं आहे.

हा अमिताभ यांचा मोठेपणा आहे आणि त्यामुळंच आम्ही त्यांचे चाहते आहोत, असंही या कुटुंबानं म्हटलं आहे.