ह्त

काही दिवसांपूर्वी विराटच्या बॅटमधून पूर्वीसारख्या धावा निघत नसल्याने त्याला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत होतं

 त्यादरम्यान त्यानं क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. तो आता फ्रेश करून परत येण्याचा प्रयत्न करत आहेत.

नुकतच विराटनं एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली, त्यात विराटनं म्हटलं आहे की, आपण नेहमी खंबीर राहण्याचा प्रयत्न करतो पण कधी तसं होत नाही.

नवीन खेळाडूंना एवढच सांगायचं आहे की, शारिरीक तंदुरस्ती महत्वाची आहे, पण स्वत:शी नाते तयार करणे तितकचं महत्वाचं आहे.

मला बऱ्याचदा असं वाटलं की, मी अशा खोलीत आहे जिथं सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करतात पण तरीही मी एकटा आहे.

मला काय म्हणायचंय हे लोक समजू शकतात. म्हणून स्वत: शी नाते तयार करण्यास वेळ काढा.