'एक हजारो में मेरी बहना है' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री तिच्या हटक्या लुकमुळे नेहमी चर्चेत असते.

 तिनं नुकतंच एका मुलाखतीत म्हटलं आहे की, 

मी जन्मत: सुंदर नाही, म्हणून मी स्वत:ला सुंदर करण्यासाठी खूप प्रयत्न केले. 

मी इंडस्ट्रीत आल्यावर जेव्हा मला कळालं की, सुंदर दिसणं गरजेचं असतं, तेव्हा मी स्वत:वर खूप मेहनत घेतली. 

मला सुरवातीला मेकअप येत नव्हता, त्यामुळं इंडस्ट्रीत माझा मेकअप कसातरी करायचा म्हणून करून द्यायचे.

मग मी स्वत:ला पाहून रडायचे. पण नंतर मी युट्युबवर बघून मेकअप शिकले. 

 आता मोठे स्टायलिस्ट माझा मेकअप करण्यासाठी मला मेसेज पाठवतात. 

 याचा मला खूप आनंद होतो.