ह्त

अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी आपल्या उत्तम अभिनयानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

आता पंकज यांनी पर्यावरणासाठी एक नवीन मोहीम राबवल्याने त्यांचे कौतुक केलं जात आहेत.

पंकज हे सध्या त्यांच्या बिहारमधील गोपालगंज या गावी गेले आहेत.

आपल्या गावतून बोलताना त्यांनी सांगितलं की, त्यांनी वृक्ष लागवडीचे काम हाती घेतले आहे, आणि त्याची सुरवात त्यांनी त्यांच्या गावापासून  केली आहे.

 ते म्हणाले की, सध्या 500 झाडे लावण्याचे लक्ष ठेवले आहे. आतापर्यंत 51 झाडे लावली आहेत.

 या झाडांची ते  5 वर्षे काळजी घेणार आहेत.