गायक जुबिन नौटियालला अमेरीकेतील काॅन्सर्टबाबत, 'देशविरोधी' म्हणत ट्रोल केलं जात आहे. 

कारण या कार्यक्रमाचे आयोजक खलिस्तानी सदस्य आणि गुन्हेगार आहेत, असं म्हणलं जात आहे. 

यावर जुबिन स्पष्टीकरण देत म्हणाला, या वादामुळे माझ्या आईला धक्का बसला आहे. ती डिप्रेशनमध्ये आहे. 

आम्ही ऑगस्ट महिन्यात कार्यक्रम रद्द केला आहे.

करार माझे व्यवस्थापक मंडळी आणि हरजिंदर सिंग नावाच्या प्रोमोटरमध्ये झाला होता. 

ट्विटर ट्रेंडवरून पेड बातम्या केल्या, परंतु मला विचारण्याची मेहनत कोणीही घेतली नाही.