ह्त

कंगना रणौत तिच्या बेधडक वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते.

आता कंगना पुन्हा एकदा तिच्या सोशल मिडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. 

  तिने इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली आहे. त्यात तिनं म्हटल आहे की,

 अनैतिक, भ्रष्ट आणि पूर्णपणे अन्यायकारक असलेल्या फिल्मफेअरवर मी 2014 पासून बंदी घातली आहे.

पण तरीदेखील यावर्षीच्या फिल्मफेअर सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मला अनेक फोन येत आहेत.

कारण त्यांना मला 'थलायवी' या चित्रपटासाठी पुरस्कार द्यायचा आहे.

मला आश्चर्य वाटल की, तरीदेखील ते मला नामांकन देत आहेत.

कोणत्याही भ्रष्ट प्रथांना प्रोत्साहन देणं हे माझ्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे.

म्हणूनच मी फिल्मफेअरविरुद्ध केस करण्याचा निर्णय घेतला आहे.