प्रसिद्ध स्टॅंडअप काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांच्या निधानानं देशभरात शोककळा पसरली आहे.  

त्यांच्या जाण्यानंतर अनेक कलाकार तसेच राजकीय नेते त्यांना आदरांजली वाहत आहेत.   

 पंतप्रधान नरेंंद्र मोदींनीही ट्विट करत, श्रीवास्तव यांच्याबदद्ल आपलं मत व्यक्त केलं आहे.   

मोदी म्हणाले, राजू श्रीवास्तव यांनी आपले जीवन हास्य, विनोद आणि सकारात्मकतेने उजळले.  

ते आपल्यातून निघून गेले असले तरी, त्यांच्या इतक्या वर्षांच्या कार्यामुळं, 

ते असंख्य लोकांच्या ऋदयात जिवंत राहतील. 

त्यांचे निधन दु:खद आहे.  

त्यांच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना संवेदना.