अभिनेत्री स्वरा भास्कर आपले मत बिनधास्तपणे व्यक्त करत असते.  

नुकतंच एका मुलाखतीत स्वरा तिच्या लव्ह लाईफबद्दलही बिनधास्त बोलली आहे. 

स्वरा म्हणाली, मी माझी लव्ह लाईफ खराब करण्यासाठी, शाहरूख खान आणि आदित्य चोप्राला जबाबदार मानते. 

कारण मी लहान असताना 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा चित्रपट पाहिला.

त्यामुळे मलाही माझा राज भेटेल, अशी आशा होती, पण वय वाढत गेलं आणि लक्षात आलं की खऱ्या आयुष्यात राजसारखं कोणीच नाही.  

स्वरानं असं मजेशीर उत्तर देत, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  

सिंगल राहणं फारच कठीण असतं, लाईफ पार्टनर शोधणं हे कचरा चाळण्यासारखं आहे, असंही स्वरा म्हणाली.