अभिनेता हर्षद चोपडा 'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेत अभिमन्यूची भूमिका साकारत आहे.     

या मालिकेतील अभि-अक्षूची जोडी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे.   

   अशातच हर्षद ही मालिका  सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. 

कारण हर्षद बिग बाॅसमध्ये सहभागी होणार आहे, असं म्हणलं जात आहे.

परंतु मालिकेचे निर्माते आणि हर्षद यांनी यावर अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.