'फुलपाखरू' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री हृता लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचली आहे.

हृतानं दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं, या मालिकेत काम केलं आहे.  

नुकतंच हृतानं मालिका आणि नाटकातून ब्रेक घेण्याचं कारण सांगितलं आहे. 

 हृता म्हणाली, मला छोट्या पडद्यामुळं सर्व काही मिळालं आहे. त्यामुळं तेथील काम मी बंद करणार नाही.

 पण गेल्या दहा वर्षांपासून मी खूप धावपळ केली आहे. 

 त्यामुळं स्वत:ला वेळ देणंही गरजेच आहे.