अभिनेत्री तेजश्री प्रधाननं गणपती आगमनाचे खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

एका फोटोत ती गणपतीची पूजा करताना दिसत आहे.

तिनं या फोटोंमध्ये हिरव्या रंगाची साडी परिधान केली असून केसात गजरा माळला आहे, यामुळं तिचं सौंदर्य अधिकचं खुलून दिसत आहे. 

तिनं या फोटोंना कॅप्शन देत, सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. 

तिचे हे फोटो चाहत्यांच्या  चांगलेच पसंतीस उतरले आहेत.