ह्त

पूजा सावंत सध्या मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.

तिचा 'दगडी चाळ 2' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने तिनं मिडियाशी संवाद साधला.

यावेळी पूजानं तिला कोणत्या अभिनेत्रीचा बायोपिक किंवा वेगळी भूमिका करायला आवडेल हे सांगितले आहे.

पूजा म्हणाली, स्वर्गीय अभिनेत्री स्मिता पाटील यांची भूमिका चरित्रपटात साकारायची आहे.

स्मिता पाटील यांचं व्यक्तिमत्व, अभिनय आणि त्यांचा पडद्यामागचा वावर हे त्यामागचं कारण आहे.

पूजाने सातवित असताना 'जैत रे जैत' हा चित्रपट पाहिला आणि स्मिता पाटील यांनी पूजाच्या मनात कायमचं घर केलं.