ह्त

सपना चौधरीनं 2018 मध्ये एका कार्यक्रमात आगाऊ पैसे घेऊनही परफाॅर्म केला नव्हता. तसेच पैसेही परत दिले नव्हते.

या कार्यक्रमाच्या आयोजकांनी हे प्रकरण न्यायलयात नेलं आहे. त्यामुळे सपनला लवकरच लखनौच्या एसीजेएम न्यायालयात हजर केलं जाणार आहे.

यापूर्वी न्यायालयाने सपनाला सोमवारी सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं

परंतु सोमवारी सपना हजर न राहिल्यानं, आणि तिनं कोणताही विनंती अर्ज  न केल्याने

न्यायालयानं तिच्याविरूद्ध अटक वाॅरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.

बुधवारी यूपी पोलीस सपनाला अटक करण्यास हरियाणाला रवाना झालेत.