गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री उर्वशी रौतेलाचं नाव पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहसोबत जोडलं जात आहे. 

नेटकऱ्यांनी या दोघांचा एक व्हिडीओ तयार केला होता, तो व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता.

आता उर्वशीनं या व्हिडीओवर, इंस्टाग्रामवर पोस्ट करत स्पष्टीकरण दिलं आहे.  

उर्वशी म्हणाली, माझ्या टीमनं एक क्यूट व्हीडिओ शेअर केला होता, जो माझ्या चाहत्यांनी कोणत्याही माहितीशिवाय बनवला आहे. 

मी प्रसारमाध्यमांना विनंती करते की, यावरून कोणतीही बातमी तयार करू नये.

तर नसीम म्हणाला, मी उर्वशीला ओळखत नाही,  माझं पूर्ण लक्ष क्रिकेटकडं आहे.