प्रसिद्ध स्टॅंडअप काॅमेडियन राजू श्रीवास्तव यांचं बुधवारी निधन झालं.   

ते आपल्या काॅमेडीतून प्रेक्षकांना खळखळून हसवत होते.   

ते काॅमेडी करताना सतत 'गजोधर भैय्या' असं नाव घ्यायचे.  

या गजोधर भय्याची एक धमाल स्टोरी आहे.  

राजू यांनी सांगितलं होतं की, मी जेव्हा मामाच्या गावी जात असे, 

तेव्हा तिथं केस कापण्यासाठी एक न्हावी येत असे.

तो न्हावी खूप मजेशीर होता.   

तो इतका मजेशीर होता की, त्याचं नाव सारख माझ्या  तोंडात येतं.