अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी लंडनमध्ये आहे.   

प्राजक्तानं नुकतंच तिनं जे देश फिरले आहेत, तेथील तिच्या फोटोंचा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं आहे की, फिरायला मिळालेला इंग्लंड हा 13 वा देश आहे. 

स्वत:च्या अथवा इतरांच्या पैशाने, कसंही चालेन पण सगळे देश फिरायची इच्छा आहे. 

प्राजक्तानं चंद्र, मंगळ आणि अंतराळसुद्धा पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.