Wedding Shubh Muhurtas 2025 | 2025 हे नवे वर्ष सुरू होऊन आता आठवडा उलटला आहे. गेल्या वर्षातील सर्व अडचणी, दुःख विसरून या नव्या वर्षात नव्या आशा, आकांक्षा घेऊन आपण प्रवेश केलाय. नवीन वर्षात नवीन संकल्प करून पुन्हा एकदा आनंदाने आणि उत्साहाने आपण नवी सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी विवाहासाठी शुभ मुहूर्त किती आणि कधी असणार, त्याबाबत आपण जाणून घेऊयात. (Wedding Shubh Muhurtas 2025)
हिंदू धर्मात कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त अत्यंत महत्त्वाचा असतो. शास्त्रानुसार, जे 16 सण किंवा विधी सांगितले आहेत. त्यात लग्न सोहळा हा एक महत्त्वाचा विधी आहे. त्यामुळे विवाह करताना शुभ मुहुर्त पाहिला जातो. यात 2025 या वर्षात शुभ मुहूर्त किती आणि कोणते? ते पाहुयात-
यंदाच्या वर्षी म्हणजे 2025मध्ये विवाहासाठी एकूण 74 शुभ मुहूर्त आहेत. जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत कोणत्या दिवशी विवाह करता येऊ शकतो, याची लिस्ट खाली सविस्तर दिली आहे.
2025 विवाह शुभ मुहूर्त
जानेवारी 2025
जानेवारी महिन्यात अनेक शुभ मुहूर्त आहेत जसे की,16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 26 आणि 27 जानेवारीला शुभ मुहूर्त आहेत.
फेब्रुवारी
फेब्रुवारीमध्ये 2, 3, 6, 7, 12, 13, 14, 15, 16, 18, 19, 21, 23 आणि 25 तारीख शुभ आहे. (Wedding Shubh Muhurtas 2025)
मार्च
मार्च महिन्यात 1,2, 6, 7, आणि 12 तारीख विवाहासाठी शुभ आहेत.
एप्रिल
एप्रिल महिन्यात 14, 16, 18, 19, 20, 21, 25, 29, आणि 30 तारीख विवाहासाठी शुभ आहेत. एप्रिल महिन्यात एकूण 9 शुभ मुहूर्त आहेत.
मे
मे महिन्यात 1, 5, 6, 8, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24 आणि 28 तारीख शुभ आहेत. (Wedding Shubh Muhurtas 2025)
जून
जून महिन्यात 2, 4, 5, 7 आणि 8 या तारखा लग्नासाठी शुभ आहेत.
नोव्हेंबर
2, 3, 6, 8, 12, 13, 16, 17, 18, 21, 22, 23, 25 आणि 30 या नोव्हेंबर महिन्यातील तारखा लग्नासाठी शुभ आहेत.
डिसेंबर
डिसेंबर महिन्यात फक्त 4, 5, आणि 6 या तीन तारखा विवाहासाठी शुभ आहेत. दरम्यान, 2025 या वर्षात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, आणि ऑक्टोबर या महिन्यात विवाहासाठी कोणतेही शुभ मुहूर्त नाहीत. कारण, जून महिन्यात भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योग निद्रेला जातात. यानंतर थेट नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात शुभ मुहूर्त आहेत.
News Title : Wedding Shubh Muhurtas 2025
महत्वाच्या बातम्या –
आजपासून शाकंभरी नवरात्रोत्सव प्रारंभ, देवी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी?
’20 मिनिटांत आणून सोडतो म्हणत 36 व्या काॅलनंतर…’; सुरेश धस यांचा धक्कादायक खुलासा!
मोठी बातमी! धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार?
आता आरोपींची खैर नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT ला मिळाला महत्त्वाचा पुरावा
मुंडे-कराडांच्या जमिनी कुठे-कुठे? सुरेश धस यांनी केला धक्कादायक गौप्यस्फोट