बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात वीकेंड लाॅकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद?

पुणे |  महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे कडक निर्बंध लागू करून महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आजपासून सरकारच्या वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

पुणे महापालिकेने शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत असणाऱ्या विकेंड लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर करून नागरिकांना सतर्क करण्याचं काम केलं आहे. सोमवारपर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. वीकेंड लॉकडाऊन दरम्यान शुक्रवारी संध्याकाळपासून सोमवारी सकाळपर्यंत मेडिकल तसेच दूध विक्री करणारे दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये दूध विक्री करणाऱ्या दुकानांना सकाळी 6 ते 11 या कालावधीतच आपली दुकानं उघडी ठेवता येणार आहेत. तसेच इतर सर्व आस्थापना व दुकानं या वीकेंड लॉकडाऊनच्या काळात पूर्णपणे बंद असणार आहेत.

तसेच हॉटेल, रेस्टॉरंटमधून जेवण पार्सल घेऊन जाण्यासाठी लोकांना घरातून बाहेर निघण्यास परवानगी असणार नाही. याशिवाय ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्यांच्या मुलांना या काळात काम करण्यास मुभा देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात परीक्षेला जाणाऱ्या किंवा परतणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली असून त्यांनी जवळ वैध हॉल तिकीट बाळगणं बंधनकारक असणार आहे.

या व्यतिरिक्त पुणे महानगरपालिका क्षेत्रात घरगुती काम करणारे, वाहन चालक, ज्येष्ठ नागरिकांना आणि आजारी असणाऱ्या लोकांना घरी सेवा देणाऱ्यांसाठी सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त इतर कोणालाही या काळात फिरण्यास परवानगी नाही. तसेच कोणत्याही आस्थापनांना उघडण्यास परवानगी नाही. विनाकारण नागरिक घराबाहेर पडल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

‘लॉकडाऊनच्या निर्णयाला भाजप सकारात्मक प्रतिसाद देईल पण…’; प्रविण दरेकरांचं मोठं वक्तव्य

कोरोना रुग्णाला घेऊन जाताना तो ऊसाचा रस प्यायला थांबला, पाहा धक्कादायक व्हिडीओ

धमाकेदार ऑफर! ‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर

“मी गौतम गंभीरला माझा आदर्श मानतो”; ‘या’ स्टार खेळाडूनं सांगितलं गुपित

“निदान भाजपच्या 105 आमदारांच्या मतदारसंघातील लोकांसाठी तरी लस आणा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More