बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#TokyoOlympics | मिराबाई तुझा भारताला अभिमान, मिळवून दिलं पहिलं पदक

टोकियो | कोरोना संकटानंतर अखेर टोकियो ऑलिम्पिकला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. भारतासाठी पहिला दिवस संमिश्र राहिला. त्यातच आता भारताच्या नावावर एका पदकाची नोंद झाली आहे. महिला वेट लिफ्टिंग खेळात भारताची महिला वेट लिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकलं आहे. 49 किलो वजनी गटात तिने हे पदक जिंकलं आहे.

मीराबाई चानूने स्नैचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्क 115 किलो असे मिळून एकूण 202 किलो वजन उचललं. तर चीनच्या झू लिजुनने एकूण 210 किलो वजन उचललं. त्यामुळे चीनला सुवर्णपदक तर भारताला रौप्यपदक मिळालं आहे. हे पदक जिंकताच तिने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ऑलिम्पिकमध्ये महिला वेट लिफ्टिंग स्पर्धेत पदक जिंकणारी मीराबाई चानू ही भारताची दुसरी खेळाडू ठरली आहे. याआधी कर्नम मल्लेश्वरी हीने ऑलिम्पिक वेट लिफ्टिंग स्पर्धेत पहिलं पदक मिळवलं होतं. तिने सिडनी ऑलिम्पिक 2020 मध्ये कांस्य पदक मिळवलं होतं.

दरम्यान, ऑलिम्पिक महिला वेट लिफ्टिंग स्पर्धेत पहिलं रौप्यपदक मिळवणारी मीराबाई चानू ही पहिली खेळाडू ठरली आहे. मीराबाई चानूने पदक जिंकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचं कौतूक केलं आहे. त्याचबरोबर तिचा फोटो देखील मोदींनी शेअर केला आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्धीसाठी कायपण! ‘या’ 7 अभिनेत्रींच्या न्यूड फोटो-व्हिडीओंचा इंटरनेटवर धुमाकूळ

राज कुंद्राला ‘या’ अभिनेत्रीचा सपोर्ट, म्हणाली…

शेअर मार्केटमध्ये पैसे लावणाऱ्यांनो… ‘डीमॅट’च्या नियमात 1 ऑक्टोबरपासून मोठा बदल!

शिल्पा या प्रश्नांची उत्तरं दे… चौकशीत क्राईम ब्रांचनं विचारले हे 10 प्रश्न

#TokyoOlympics | पोरगं महाराष्ट्राचं नाव काढणार!; तिरंदाजीत दमदार कामगिरी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More