बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो – देवेंद्र फडणवीस

मुंबई | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कोरोनाच्या संकटाच्या काळात राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये, यासाठी विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाकडे शिफारस करण्याचा जो निर्णय घेतला आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.

संविधानाच्या तत्वांचं पालन करतच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोग या शिफारशीवर केंद्रीय गृहमंत्रालयाशी सल्लामसलत करून तत्काळ विधान परिषदेच्या निवडणुका घेण्याचा निर्णय करेल, हा आम्हाला विश्वास वाटतो, असं फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

काल इरफान खान, आज ऋषी कपूरजी.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय- विराट कोहली

परराज्यातील मजूर आणि विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने उचललं मोठं पाऊल

महत्वाच्या बातम्या-

राज्यपालांचं निवडणूक आयोगाला पत्र; विधानपरिषदेच्या रिक्त जागांच्या निवडणुकीची मागणी

राज्यात दिवसभरात तब्बल 583 कोरोनाचे नवे रुग्ण; एकूण आकडा 10498 वर

मुंबई, पुण्यातील लोकसंख्या कमी करण्याची गरज- प्रकाश आंबेडकर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More