बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं पुण्यात जल्लोषात स्वागत; पाहा व्हिडीओ

पुणे | आयपीएल 2021 मध्ये कोलकातावर धमाकेदार विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल किताबचा चौकार मारला. चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने या हंगामातील सर्वात जास्त धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आहे. ऋतुराज गायकवाडने चेन्नई संघाकडून खेळताना देशातील सर्वांची मनं जिंकली. आयपीएल संपल्यानंतर ऋतुराज आपल्या राहत्या घरी पुण्यात पोहचला. त्यावेळी त्यांच पुणेकरांनी जल्लोषात स्वागत केलं.

अंतिम सामन्यात कोलकाता संघाविरूद्ध ऋतुराज गायकवाडने 27 चेेंडूत 32 धावांची खेळी करत या हंगामातील सर्वात जास्त 635 धावा केल्या. चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सलामीवीर फलंदाज फाफ डुप्लेसिसची ऑरेंज कॅप अवघ्या दोन धावांनी हुकली. त्यामुळे ऑरेंज कॅप ही ऋतुराज गायकवाडने आपल्या डोक्यावर चढवली.

आयपीएल संपल्यानंतर ऋतुराजचं रविवारी पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या घरी आगमन झालं. त्यावेळी पुणेकरांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं. त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. चिंचवडच्या घरी परतला तेव्हा तो गाडीतून रिकाम्या पायाने उतरला. यावेळी साधेपणा आणि परंपरेला जपणारा ऋतुराज सर्वांना आवडला.

दरम्यान, आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जने चौथ्यांदा किताब मिळवला. या हंगामात ऋतुराज गायकवाडने चेन्नई संघाकडून खेळताना 1 शतक आणि 4 अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने  64 खणखणीत चौकार तर 23 गगनचुंबी षटकार ठोकले आहे. ऑरेंज कॅप मिळणवारा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू म्हणूनही त्याच्या नावावर विक्रम नोदंवला गेला आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

रेल्वेच्या ‘या’ विभागाने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

‘मी मोठी नेता नसल्याचं पवारसाहेब म्हणाले असतील पण मी…’; पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर

भारताच्या कोरोनाविरुद्धच्या लढ्याचं वर्ल्ड बँकेनं केलं तोंडभरून कौतुक, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More