केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या कुटुंबात नवा पाहुणा दाखल! –
मुंबई | आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या कुटुंबात नवा पाहुणा दाखल झाला आहे. रामदास आठवलेंनी मुंबईतल्या बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बिबट्या दत्तक घेतला आहे. गेल्या चार वर्षांपासून आठवले बिबट्या दत्तक घेत आहेत.
रामदास आठवलेंनी गेल्या वर्षी भीम नावाचा बिबट्या दत्तक घेतला होता. मात्र त्याचं आकस्मिक निधन झालं. त्यामुळे त्यांनी यंदा दोन बिबटे दत्तक घेतले असून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. यासंदर्भात आठवलेंनी ट्विट केलं आहे.
माझे नेतृत्व भारतीय दलित पँथर मधून पुढं आले आहे. अमेरिकेत जशी ब्लॅक पँथर तर तशी भारतात दलित पँथर ही संघटना होती. दलित पँथर पासून आम्हाला पँथर बद्दल विशेष प्रेम असल्यामुळे पँथर दत्तक घेतला. या पँथरचं नाव सिंबा ठेवण्यात आलं असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पर्यावरण रक्षणासाठी निसर्ग संवर्धनासाठी प्राणीप्रेम जोपासण्याचा संदेश देण्यासाठी आपण बिबट्या दत्तक घेतला असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. त्यालसोबतच त्यांनी निसर्ग साखळी टिकविण्यात बिबट्याची महत्वाची भूमिका असल्याचंही आठवले म्हणाले.
प्राणिप्रेम निसर्गप्रेमाचा संदेश देण्यासाठी बिबळ्या वाघ पँथर दत्तक घेतला. दलित पँथर संघटने पासून आमचे पँथर या प्राण्याबद्दल प्रेम राहिले आहे. त्यामुळे नॅशनल पार्क मुंबईत आज पँथर दत्तक घेतला. pic.twitter.com/PuLotnB0Iy
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) February 15, 2021
थोडक्यात बातम्या-
शरद पवारांच्या आदेशानंतर ‘या’ आमदाराची पक्षातून हकालपट्टी!
“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद
…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार
Comments are closed.