बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये- सुभाष देसाई

मुंबई | शैक्षणिक क्षेत्रात डिजीटल युग आले असले तरी आधुनिक तंत्रज्ञानाचे स्वागत करताना पाठांतराला दुय्यम समजू नये, असे आवाहन राज्याचे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी केले आहे.

राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पाढे पाठांतर स्पर्धा आयोजित केली आहे. सुभाष देसाई यांच्या हस्ते या स्पर्धेचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले की, “गणिताची गोडी वाढविण्याचा हा प्रयत्न स्त्युत आहे. आता किती शाळांमध्ये पाढे म्हणून घेतले जातात?, जुने पणाचा शिक्का मारुन पाढे दूर लोटू नका”.

या स्पर्धेसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. व 31 डिसेंबरपर्यंत पाठांतराचे व्हिडीओ अपलोड करता येतील. 15 जानेवारीला या स्पर्धेचा जिल्हास्तर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

या स्पर्धेच्या विजेत्यांना अनुक्रमे 11 हजार, 7 हजार , 5 हजार अशी पारितोषिके असणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

“लिहून घ्या, नितीश कुमार पुन्हा कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत”

“चंद्रकांत पाटील यांचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद आहे आमच्याकडे”

“…तर मातोश्रीवर दिवाळी साजरी होऊ देणार नाही”

कांजूरमार्गची जागा राज्य सरकारचीच आहे- आदित्य ठाकरे

बिहार निवडणूकीच्या प्रचारसभेत नितीश कुमारांवर फेकला कांदा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More