बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या व्यक्तीचं कल्याण झालं- चंद्रकांत पाटील

मुंबई | संपुर्ण गुजरात माॅडेलचा प्रचार देशभर करत नरेंद्र मोदी यांनी देशाची सत्ता हस्तगत केली होती. 2014 ला देशात सर्वत्र मोदी या नावाचं वारं वाहत होतं. परिणामी देशात संपुर्ण बहूमताने भाजपची सत्ता आली. नरेंद्र मोदी यांनी आपली सत्ता 2019 मध्ये पुन्हा राखण्याचं काम केलं आहे. आज 17 सप्टेंबर नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे.

देशभर नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपतर्फे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास शब्दात मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी मोठ्या स्वरूपातील विकासकामं केली आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मोदी विकास घेऊन गेले आहेत. पंतप्रधान मोदींमुळे रांगेतील शेवटच्या माणसाचं पण कल्याण झालं आहे, असं म्हणत मोदींच्या कार्याचा गौरव केला आहे.

देशाला कोरोना महामारीच्या तावडीतून वाचवण्याचं काम सुद्धा मोदी यांंनी केलं आहे. मोदी पंतप्रधान झाल्यापासून देशातील गरीबी हटाव मोहीम अगदी तीव्र झाली आहे. देशातील जनतेची बॅंकेत खाती सुद्धा नव्हती. मोदी यांनी देशभरातील नागरिकांची जन-धन योजनेच्या माध्यमातून खाती काढण्याचं काम केलं आहे.

गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून देशात विविध भागात जनतेला लाभ मिळाला आहे. पंतप्रधान कौशल विकास योजनेच्या माध्यमातून देशातील युवकांच्या हाताला काम मिळालं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“महाविकास आघाडीने मित्रपक्षांचा विचार न केल्यास आम्ही…”

मोदीजींच्या वाढदिवशी #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस ट्रेडिंगमध्ये

‘पुढचे 3 महिने अत्यंत महत्वाचे’; केंद्र सरकारने नागरिकांना केलं हे महत्त्वाचं आवाहन

“मराठवाडा वाॅटर ग्रीडची अवस्था राजाच्या मेलेल्या पोपटासारखी”

“आपण सर्व भारतीय पंतप्रधान मोदींना हे गिफ्ट देऊयात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More