बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला बांधला, नाहीतर कोणीतरी म्हणेल मीच बांधला”

मुंबई | गेल्या अनेक वर्षापासून चिपी विमानतळाचा मुद्दा चर्चेत होता. त्यानंतर आता चिपी विमानतळ आजपासून सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. याच मुद्द्यावरून आता राजकारण अखेर तापलेलं दिसत आहे. आज या चिपी विमानतळाचं उद्घाटन कार्यक्रमात जोरदार राजकीय टोलेबाजी पहायला मिळाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना टोमणे मारले आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, नाहीतर कुणीतरी म्हणेल मीच बांधलाय, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना टोला लगावला आहे. बाळासाहेबांना खोटं बोलणारी माणसं आवडत नव्हती, त्यामुळे त्यांनी त्यांना पक्षातून काढून टाकलं, असा टोला देखील उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना लगावला आहे.

आताचा आजचा हा क्षण आदळ आपट नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. पर्यटनावर तळमळीनं आणि मळमळीनं बोलणं वेगळं आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे अधिक तळमळीने बोलत होते. पाठांतर करून बोलणं आणि आत्मसात करून बोलणं वेगळं आहे. शिवसेना आणि कोकणाचं नातं काही वेगळं सांगायला नको, असं मुख्यमंत्री या कार्यक्रमात म्हणाले आहेत.

दरम्यान, ही जाहीर सभा नाही, दुर्देवानं आणि नाईलाजानं बोलावं लागतंय, असंही उद्धव ठाकरे म्हणाले, पेढ्यातला गोडवा दाखवावा लागतो, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

राष्ट्रवादीनंतर आता शिवसेनेचाही आर्यनला पाठिंबा?, अरविंद सावंतच्या वक्तव्यानं खळबळ

‘शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात’; ‘या’ भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

राजू शेट्टींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले…

अविनाश भोसले यांच्या अडचणी वाढल्या; पोलिसांकडून गुन्हा दाखल

मुंबई ड्रग्स प्रकरणी नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More