बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देशाबाबत कितीही गर्व करत असले तरी, अवैज्ञानिक लोक देशाला बरबाद करू शकतात”

मुंबई | कोरोनाच्या संकटामुळे देशाला आर्थिक संकटातून जावं लागतं आहे. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांचा देखील तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. लसीकरणावर मोहिम राबवण्यावर सध्या सरकार जोर देत आहे. तसं असलं तरी भारतात सध्या दोनच लसींना परवानगी देण्यात आली आहे. कोरोना रूग्णसंख्या वाढत असताना देखील 4 महिन्यानंतरही परदेशी लसींना भारतात परवानगी दिली गेली नाही. त्यामुळे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी मोदी सरकारवर टीका केला आहे.

देशात कोरोना महामारीचा प्रकोप वाढला असून कोरोना रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फायझर आणि माॅडर्ना या दोन चांगल्या लसी आहेत. मागील वर्षी डिसेंबर 2020 मध्येच त्या सर्वांना उपलब्ध झाल्या आहेत. तर मग आतापर्यंत त्या भारतात का आणल्या नाहीत. आपण चांगल्या लसीच्या लायक नाही का?, असा खोचक सवाल प्रसिद्ध लेखक चेतन भगत केंद्र सरकारला विचारला आहे.

आपण सुरक्षा उपकरणे बाहेरून आणत नाही का? तर मग कोरोना ही युद्धजन्य परिस्थिती नाही का ? लस फक्त आणि फक्त भारतातच बनवायला हवी का? अवैज्ञानिक लोक कोणत्याही देशाला बरबाद करू शकतात, भले ते देशाबाबत कितीही गर्व करत असले तरी, अशा कडक शब्दात चेतन भगत यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, आपल्याला हवी तेवढी किंमत देऊन भारतात लस उपलब्ध करून द्यायला हवी. मग ती लस भारतात बनवलेली असो किंवा परदेशातून आयात केलेली असो. आपल्या भारतात गल्लोगल्यात लसीकरण राबवण्याची गरज आहे तरच आपण कोरोनाच्या विळख्यातून सुटू शकू, असंही चेतन भगत यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

‘महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करा’; महाराष्ट्र दिनानिमित्त राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी

मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, दंड मागणाऱ्या पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा

‘जगाल तर जेवाल’; लाॅकडाऊन वाढवण्याबाबत जितेंद्र आव्हाडांची रोखठोक भूमिका

अदर पुनावाला यांना गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा!

डु प्लेसिस-ऋतुराजची धमाकेदार खेळी, चेन्नईने हैदराबादला नमवलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More