बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…हे आम्ही बघू, बाहेरच्यांनी नाक खुपसायची गरज नाही”

मुंबई | राज्यातील विधान भवनात पाच दिवसांचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) पार पडलं. या पाच दिवसांमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप पहायला मिळाले. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत पार पडलं. मात्र हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्रीच उपस्थित नसल्यानं विरोधकांनी सरकारवर ताशेरे ओढले.

हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची अनुपस्थितीमुळे अनेक टीका-टीकास्त्र पहायला मिळालं. अशातच आता यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना सुनावलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगलंच खळबळ माजली आहे.

मुख्यमंत्र्यांचा चार्ज कोणाला द्यायचा, हे आम्ही ठरवू. बाहेरच्यांनी त्यात नाक खुपसायची गरज नाही, असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, चहापानाच्या कार्यक्रमामुळे स्टॅंपवर लिहून का, असा दावा मी केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटलं जातं स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत, असं अजित पवार यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

‘…माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही’; मुख्यमंत्र्याच्या पत्रावर राज्यपालांची नाराजी

‘…अन्यथा अजून कडक निर्बंध लावले जातील’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

विदर्भात आजही पावसाची शक्यता, ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा झटका

“…याला समलिंगी संभोगाचे आकर्षण आहे, हे कोण सिद्ध करणार?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More