बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रेल्वे रुळावर बाईक स्टंट करायला गेला अन् अचानक ट्रेन आली, पाहा व्हिडीओ

गांधीनगर | अलीकडे सर्वांना व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर करण्याचा वेगळाच नाद लागला आहे. यासाठी अनेक जण हास्यस्पद व्हिडीओ बनवतात तर काही जण स्टंटचे. अशातच एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. एक व्यक्ती बाईकवर रेल्वे रूळावर स्टंट करत असताना अचानक ट्रेन येते. ही घटना कॅमेरामध्ये कैद झाली आहे.

संबंधित घटना ही जामनगर येथील आहे. जामनगर येथील सांढिया पुल येथे एक तरुण रेल्वे ट्रॅकच्या समोर बाईक स्टंट करत होता. यादरम्यान तो तेथे फोटो काढण्यासाठी थांबला होता. अशातच मागून ट्रेन आली आणि तरुण घाबरुन साईडला पळाला. मात्र त्याची स्कूटी रेल्वे ट्रॅकवरच राहिली.

रेल्वे ट्रॅकवर स्कूटी राहिली आणि रेल्वेमुळे स्कूटी रेल्वेखाली आली. या थरारक घटनेचा सर्व प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे. तसेच या व्हिडीओला पाहून कोणीही हैराण होईल. अशातच कोणत्याही प्रकारची दुर्घटना होण्यापासून वाचली आहे. मात्र स्कूटीची जी अवस्था झाली ते पाहून सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करुन आपली वेगवेळी प्रतिक्रीया देत आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

‘या’ वयोगटातील मुलांना मास्कची गरज नाही; वाचा केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स

“मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांना विरोध नाही, पण आम्ही काय भिकारी आहोत का?”

“काँग्रेसच्या अस्तित्वासाठी राहुल गांधींना मजबूत टीम तयार करावीच लागेल”

पुण्यातील प्रसिद्ध महात्मा फुले मंडईच्या इमारतीमधील लाकडी भागाला आग

नवी मुंबईतील विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचं नाव – एकनाथ शिंदे

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More