बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

’21 तारखेला जर परीक्षा झाली नाही तर…’; गोपीचंद पडळकरांंचा राज्य सरकारला इशारा

पुणे | महाराष्ट्र राज्यसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘राज्यसेवा पुर्व परीक्षा’ पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने काल राज्यभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन केलं होतं. मुुख्यमंत्र्यांनी केलेल्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं. मात्र यानंतरदेखील भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर टीका केली आहे.

सरकारची जत्रा अन् कारवाई सतरा असा या सरकारचा कारभार सुरू आहे. 21 तारखेला जर परीक्षा झाली नाही, तर मी या विद्यार्थ्यांसोबत वर्षा निवासस्थानाबाहेर उपोषणाला बसेल, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. त्यासोबतच कोरोना काळात परीक्षा न झाल्यामुळे परीक्षार्थींसाठी 2 वर्षांची वयोमर्यादा वाढवण्यात यावी, अशी मागणीही पडळकरांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या बाबतीत परीक्षा पुढे ढकलून सरकारने विद्यार्थ्यांचा विश्वासघात केला आहे. विद्यार्थ्यांच्या भावनेशी सरकार खेळतंय. माझ्यासोबत आंदोलनात असलेले विद्यार्थी लादेन समर्थक होते का? पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार का केला?, असा सवालही गोपीचंद पडळकरांनी केला आहे.

दरम्यान, या सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोग्रॅमपैकी विश्वासघात हा एक प्रोग्रॅम आहे. कधी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबत, कधी धनगर समाजाला निधी देण्याच्या बाबतीत, कधी शेतकऱ्यांच्या बाबतीत, कधी लाईट बिलाच्या बाबतीत, या मुद्दयांवरून पडळकरांनी टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“राज्याचा अर्थसंकल्प फक्त पुण्याभोवती केंद्रीत, महाराष्ट्रातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक”

व्वा पंत! रिषभचा जोफ्रा आर्चरच्या बॅालिंगवर जबरदस्त ‘रिव्हर्स स्वीप’, पाहा व्हिडीओ

मी काही अजून एमपीएससीचा अध्यक्ष झालेलो नाही- अजित पवार

“मंत्रिपदासाठी पैसे दिलेत, ते वसूल झाल्याशिवाय राजीनामा कसा देईल?”

पुणेकरांनो सावधान! ‘कोरोना’ शहरात फोफावतोय, पाहा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More