बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तर प्रदेश हे राम राज्य नाही, किलिंग राज्य- ममती बॅनर्जी

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी या ठिकाणी शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचाराप्रकरणी केंद्र राज्यगृह मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशात राज्यात भाजप नेहमी रामराज्याविषयी बोलत आहे. परंतु ते राम राज्य नाही आहे ते किलिंग राज्य आहे. लोक मारले जातात आणि सरकार 144 कलम लागू करत आहे. एका मंत्र्याच्या मुलाने लखीमपूर खीरीमध्ये इतक्या शेतकऱ्यांची हत्या केली आहे. आम्ही त्याचा निषेध व्यक्त करतो, असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांनी शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी चढवली.  या घटनेत अनेक शेतकरी गंभीर झालेत तर दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शेतकरी आक्रमक झाले आणि मंत्र्याच्या गाड्या पेटवून दिल्या. या घटनेवर अनेक लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशमधील घटनेवर काॅंग्रेससह देशातील सर्वच आक्रमक झाले आहेत. काल रात्री काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या शेतकऱ्यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी रोखलं.

थोडक्यात बातम्या-

“आमचे 20 आमदार कमी पडले, जर आम्ही धोका झाला असता तर…”; चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र!

“निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडून घ्या पण, मतदान भाजपलाच करा”

‘उत्तर प्रदेश हे नवं जम्मू काश्मीर आहे’; माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांचं टीकास्त्र!

‘या’ संशोधनासाठी डेव्हिड ज्युलियस आणि आर्देम पटापाउटियन यांना वैद्यकशास्त्रातील 2021 चा पुरस्कार

‘चिटिंग करणाऱ्यांचं….’; नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटानंतर एक्स बॉयफ्रेंडचा समंथावर निशाणा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More