बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ममता बॅनर्जींचा पाणीपुरी बनवतानाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!

नवी दिल्ली | पाणीपुरी हा तर सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. आपला एखादा पाणीपुरीचा स्टाँल ठरलेला असतो. तेथील पाणीपुरी खाल्याशिवाय आपल्याला पाणीपुरी(Panipuri) खाल्यासारखं वाटतच नाही. अशात तुम्हाला कोणी मुख्यमंत्र्यांनी पाणीपुरी तयार करुन खायला दिली तर? असंच काहीसं दार्जिलिंगमध्ये घडलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी पाणीपुरी तयार करून सहकाऱ्यांना आणि तेथील पर्यटकांना खायला दिली आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या ट्विटरवर ट्विट करण्यात आला आहे. त्या दार्जिलिंगला  गेल्या होत्या त्यावेळी त्यांचा हा वेगळा अंदाज दिसून आला.

रविवारी दार्जिलिंगमधील हाट येथे एसएचजीच्या माध्यमातून स्वयंरोजगार (Self-employment) करणाऱ्या एका महिलेच्या पाणीपुरी स्टॉलला ममता बॅनर्जींनी भेट दिली. यावेळी त्यांना पाणीपुरी तयार करण्याचा मोह आवरला नाही. संवाद साधत त्यांनी ही पाणीपुरी तयार केली. त्या व्हिडीओमध्ये त्या पाणीपुरीत बटाट भरताना दिसून येत आहेत.

दार्जिलिंगमध्ये (Darjeeling) एका कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या. मागच्या वेळेस त्यांनी अशाच प्रकारे मोमोज हा येथील स्थानिक लोकप्रिय पदार्थ एका फूड स्टॉलवर तयार केला होता. ममता बॅनर्जी आपल्या जनसंपर्क आणि लोकप्रियतेमुळे कायमच चर्चेत असतात. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांचं कौतुक केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

आदित्य ठाकरेंवरील टीकेमुळे किशोरी पेडणेकर संतापल्या, म्हणाल्या…

‘द्रौपदी मुर्मूंकडून दुष्ट प्रवृत्तीचं प्रतिनिधित्व’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

मोठी बातमी! श्रीलंकेत आणीबाणी जाहीर

लस घेतल्याने ‘या’ कॅन्सरचा धोका कमी होणार, अदर पूनावाला यांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

लिंबू पाणी जितकं प्रभावी तितकंच घातकही, उद्भवू शकतात ‘हे’ सहा आजार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More