बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंगालमध्ये कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो हटवून ममतांचा फोटो लावला

कोलकाता | देशातील कोरोनाचा जोर ओसरत असला तरी राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेताना दिसत नाहिये. आतापर्यंत वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असायचा. मात्र आता वॅक्सीनेशन कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात 18-44 वयाच्या नागरिकांच्या वॅक्सीनेशन सर्टिफिकेटवर बंगालमध्ये पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी याचा फोटो लावला जात आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगड सरकारनं कोरोना लस घेणाऱ्यांना दिलेल्या प्रमाणपत्रात पंतप्रधानांऐवजी राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा फोटो वापरल्यानं राजकीय गदारोळ झाला होता. आता पश्चिम बंगाल सरकार त्याच धर्तीवर राज्यात कोरोना प्रमाणपत्र देताना पंतप्रधान मोदींच्या ऐवजी ममता बॅनर्जी यांचा फोटो लावलेला दिसत आहे.

पश्‍चिम बंगालमध्ये राज्य सरकारने कोरोनाप्रतिबंधक लस घेणाऱ्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे छायाचित्र असलेले प्रमाणपत्र द्यायला सुरुवात केली आहे. राज्य सरकार उत्पादकांकडून थेट लशींची खरेदी करत असल्याने आम्ही लसीकरण प्रमाणपत्रावर मुख्यमंत्र्यांचा फोटा वापरण्याचा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यानं सांगितलं.

दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीपासूनच भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला होता. निवडणुका जाहीर झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून लसीकरण प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेप घेतला होता. आचारसंहितेचं उल्लंघन होत असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला होता. मात्र आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा फोटो लसीकरण प्रमाणपत्रावर लागणार असल्यानं दोन्ही पक्षांमधील वाद आणखी वाढणार आहे.

थोडक्यात बातम्या – 

महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा सोमवारपासून पूर्णपणे अनलॉक, पाकमंत्र्यांनी केली घोषणा 

टिक-टॉकवर बंदी, पण कंपनी करतेय सर्व भारतीय नियमांचं पालन; टिकटॉकचा भारतात कमबॅक होणार?

“काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षांचं सरकार येईल असा विचार माझ्याही मनात कधी आला नव्हता”

प्रत्येक महाविद्यालयात साजरा होणार शिवस्वराज्य दिन; मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा

‘ही’ असू शकते भारतातील सर्वात स्वस्त लस, जाणून घ्या किंमत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More