बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंत्र्याच्या घरी सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले

कलकत्ता | पश्चिम बंगालच्या बहुचर्चित SSC घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (Enforcement Directorate) आज छापा टाकला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सक्त संचलनालयाकडून प्राप्त माहितीनुसार या धाडीत 20 कोटींपेक्षा जास्त रोकड जप्त करण्यात आली. या नोटांचे मातीसारखे ठीग करण्यात आले, एवढ्या मोठ्या प्रमाणात ही रक्कम आहे.

सक्तवसुली संचलनालयाच्या एका टीमने बंगालच्या बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळा (SSC Scam) प्रकरणी तपासासाठी शुक्रवारी बंगालच्या दोन मंत्र्यांच्या घरांवर छापे टाकले. पार्थ चॅटर्जी (Parth Chatterjee) आणि परेश अधिकारी (Paresh Adhikari) यांच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली. सक्तवसुली संचलनालयाचे तब्बल सात ते आठ अधिकारी या दोघांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी 3 तास तपास करत ही धक्कादायक माहिती समोर आणली.

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पश्चिम बंगाल स्कूल सेवा आयोगाच्या (The West Bengal School Service Commission) शिफारशीनुसार सरकारद्वारे अनुदानित (Granted) आणि विनाअनुदानित (Non-Granted) शाळांमध्ये सी आणि डी समूहाच्या कर्मचाऱ्यांची आणि शिक्षकांची भरती करण्यात आली. या भरतीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला. यावेळी पैशांची मोठ्या प्रमाणात अफरातफर आणि देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली.

हा घोटाळा झाला तेव्हा, काबिल चॅटर्जी (Kabil Chatterjee)  हे शिक्षण मंत्री होते. आता ते ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि वाणिज्य मंत्री पदावर आहेत. यापूर्वी सीबीआयने (CBI) दोन वेळा त्यांची चौकशी केली होती. आता या प्रकरणाचा सीबीआय आणि सक्तवसुली संचलनालय युद्धपातळीवर तपास करत आहे. यात घोटाळ्यात अजून मोठ्या प्रमाणात माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या –

‘अनिल परबांचा फोन तपासा…’; दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट

‘या’ लोकांना दारूपासून जास्त धोका; अभ्यासातून अत्यंत धक्कादायक माहिती समोर

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये”

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More