देश

अखेर तीन दिवसांनंतर ममता बॅनर्जींचं धरणं आंदोलन मागे

कोलकाता | पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर तीन दिवसांनंतर धरणं आंदोलन मागे घेतलं आहे. 

हे धरणं आंदोलन म्हणजे राज्यघटना आणि लोकशाहीचा विजय आहे, असं बॅनर्जी म्हणाल्या. यानंतर आपण धरणं आंदोलन मागे घेत आहोत, अशी घोषणा त्यांनी केली. 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी ममता बॅनर्जींची भेट घेतली आणि सर्व विरोधकांना तुमचा पाठिंबा असून आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. 

दरम्यान, शारदा चिटफंड घोटाळ्याप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआय पथकाला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरुन हा वाद सुरू झाला होता.

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस मुख्यालयात लागली ‘प्रियांका गांधी-वाड्रा’ नावाची पाटी, भावा शेजारी बहिणीची केबीन!

चालू सामन्यात मैदानावरच क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास

काँग्रेसला मोठा धक्का, कदाचित ‘हा’ नेता लोकसभा निवडणुक लढणार नाही!

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक! भाजपला शह देण्यासाठी प्रशांत किशोरांना घेतलं ताफ्यात

“स्वाईन फ्लू संसर्गजन्य आजार, तरीही तो घेऊन लोकं प. बंगाल येतात”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या