खेळ

वेस्ट इंडिजचा भारतावर 8 गडी राखून विजय; सिमन्सनचं तडाखेबंद अर्धशतक

तिरूवनंतपुरम  | वेस्ट इंडिजने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर 8 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा निर्णायक सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब झाली. सलामीचा लोकेश राहूल 11 धावा तर रोहीत शर्मा 15 धावांवर बाद झाला. बढती मिळालेल्या शिवम दुबेनं 30 चेंडूत 54 धावांचे महत्वपुर्ण योगदान दिलं. तर ऋषभ पंतनं नाबाद 33 धावांचे छोटेखानी खेळी केली.

भारतानं 20 षटकांत 170 धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिज कडून  केस्ट्रिक विल्यम्स आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर, कॉटरेल, पेरी आणि होल्डर यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी प्रभावी मारा करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले.

वेस्ट इंडिज कडून सिमन्सने  नाबाद 67 धावांची सामनावीराची भुमिका बजावली. त्याला लेवीसने 40, हेटमायर 23, तर पुरणने नाबाद 38 धावांचे योगदान दिलं. भारतीय खेळाडूंनी सामन्यात 3 झेल सोडले. भारताकडून वाशिंगटन सुंदर आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या