बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांसंदर्भात चंद्रकांत पाटलांचं मोठं भाकीत

जळगाव |  राज्यात महायुतीच्या 44 जागा येतील तर पश्चिम महाराष्ट्रात सर्वच्या सर्व म्हणजे 10 जागा महायुती जिंकेल, असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते जळगावमध्ये बोलत होते.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला 290 जागा मिळतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळेल हे कोऱ्या कागदावर लिहून घ्या… यावर मी पैज लावायला देखील तयार आहे, असंही आत्मविश्वासाने पाटील यांनी सांगितलं आहे.

पाटील हे जळगावच्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना दुसऱ्यांदा बहुमताने मोदी सरकार सत्तेवर येणार असल्याचं भाकित वर्तवलं.

महत्वाच्या बातम्या

-नेत्यांना जबाबदारीची जाणीव राहिलेली नाही; अर्जुन कपूरची जळजळीत टीका

-…पण चोर येऊन आम्हाला पार नागडं करुन गेले; केदार शिंदेंचं मोदींवर टीकास्त्र

-मोदींना मानसिक पराभव मान्य; लोकांना उत्तर देण्याची हिंमतच उरलेली नाही- राज ठाकरे

-IPLच्या धावपळीनंतर थोडा आराम करा… कुटुंबाला वेळ द्या अन् वर्ल्डकपसाठी सज्ज व्हा- बीसीसीआय

-नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More