बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘वाढदिवसानिमित्त काय भेट देणार?’; भास्कर जाधव म्हणाले, ‘स्वच्छ सुंदर चिपळूण’

मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. अनेक पक्षांचे नेते, आमदार आणि खासदार त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देत आहेत. मात्र सध्या चर्चेत असलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव शुभेच्छा दिल्यावर मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा स्वीकारल्यावर जाधवांकडे एक भेट मागितली.

‘तुमची प्रकृती चांगली रहावी, शतायुषी व्हावं, तुमच्या हातून असंच महाराष्ट्र हिताचं काम होवो, अशा शब्दात जाधवांनी मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या. त्यानंततर मुख्यमंत्र्यांनी जाधवांकडे भेट मगितली तर जाधवांनीही छान उत्तर दिलं.

साहेब आपण चिपळूणला आला होतात. त्यावेळी मी आपल्यावतीने जनतेला शब्द दिला होता की मी माझ्या साथीदारांसह उध्वस्त झालेलं चिपळूण स्वच्छ सुंदर करेल. त्यानुसार माझ्या गुहागर मतदारसंघातील चारशे ते पाचशे लोकांसहित मी काल चिपळूण शहर स्वच्छ करण्यासाठी रस्त्यावर उतरलो. आजही लोकं स्वच्छता करत असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.

दरम्यान, अतिवृष्टी पाहणीवेळी मुख्यमंत्री रत्नागिरीमधील चिपळूण दौऱ्यावर असताना महिलेवर हात उगरल्याचा भास्कर जाधवांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

थोडक्यात बातम्या-

श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव; ‘या’ खेळाडूला झाली कोरोनाची लागण, आजचा टी-20 सामना रद्द

…अन् तिने आपल्या मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं, तळीयेतील माऊलीची शौर्यगाथा

‘ज्यांचा संबंध नाही त्यांनी पूरग्रस्त भागांचा दौरा टाळा’; शरद पवारांच्या आवाहनावर फडणवीस म्हणाले,’मी तर विरोधी पक्षनेता’

‘बाई पॅन्ट कुठे आहे?’; अभिनेत्री राधिका आपटे झाली ट्रोल

‘महाराष्ट्रातील नेता जर…’; उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रीय स्तराचं नेतृत्त्व देण्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More