बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“डिस्को आणि बार ही काय आरोग्य केंद्रे आहेत का?”

मुंबई | राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या धर्तीवर राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वर्तवला आहे. तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणासाठी आगामी गणेशोत्सव काळात राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली आहे.

राज्यात मंदिरे आणि आरोग्य केंद्रे या दोन्ही बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असंवेदनशीलता का दाखवतात?, हा आमच्या समोर प्रश्न उभारला आहे. राज्यात डिस्को, बार आणि पब ही काय आरोग्य केंद्रे आहेत का?, असा चिमटा भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना घेतला आहे. कट कमिशन आणि वाटाघाटी हा ठाकरे सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे का?, असा सवाल शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

राज्यात कोविड केअर सेंटर, आरोग्य सुविधा, सॅनिटायझेशन मध्ये जी काही कट कमिशन कारस्थाने समोर येत आहेत. त्याविषयी तुम्ही भाष्य करणार आहात का? पब, रेस्टॉरंट, डिस्को, बार यांच्या संदर्भात वाटाघाटी होतात आणि नंतर सर्व प्रकरणे उघडे पडतात. एक्साईजची कमाई व्हावी म्हणून दारूची दुकाने सुरू केले आहेत. मॉल कामगारांचे नाव सांगून मॉल सुरू केले आहेत.

दरम्यान, मंदिराच्या बाहेरील नारळ, अगरबत्ती, फुल विक्रेते यांची मुख्यमंत्र्यांना उपासमार दिसत नाही का?, की त्यांना जगण्याचा अधिकार नाही? मंदिराचे नियमावली तयार करून फुल, नारळ, विक्रेते पोट भरू शकत नाही का?, असं शेलार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या –

जगात जे काही सर्वोत्तम आहे, ते मुंबईला देण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

तालिबानविरोधात भारत ठरणार किंगमेकर???; दोन महासत्तांनी भारताकडे मागितली ‘ही’ मोठी मदत

‘मुजोर माजी मंत्रिपुत्राच्या मुसक्या आवळा’; स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन

राऊतांच्या 2 अपेक्षा, भाजपचे 5 प्रश्न; राऊत-भाजप वाकयुद्ध रंगलं!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More