बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महत्वाची बातमी! संचारबंदीकाळात वाहतुकीसाठीचे निर्बंध काय? वाचा एका क्लिकवर…

मुंबई | महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात 15 दिवसांचे कडक संचारबंदीचे आदेश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू राहणार असून त्यासाठी काही निर्बंध लावण्यात आले आहेत.

सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी काय निर्बंध असतील याबद्दल मार्गदर्शक सूचना राज्य शासनातर्फे जारी करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे ऑटोरिक्षामध्ये चालकाव्यतिरिक्त फक्त 2 प्रवासी बसू शकतात. तसेच चार चाकी टॅक्सीमध्ये वाहन क्षमतेपेक्षा 50 टक्के प्रवाशांना प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असून फक्त अत्यावश्यक सेवेतील लोक आणि कर्मचारी हेच सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करू शकतात. बसमध्ये प्रवासी क्षमता जेवढी आहे, तेवढेच प्रवासी प्रवास करू शकतात.

बाहेर गावाला जाणाऱ्या रेल्वेमध्ये कोणीही प्रवासी उभा राहून प्रवास करणार नाही, याची तपासणी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच सर्व प्रवाशांनी मास्क घातला आहे का? हे ही रेल्वे प्रशासनाला बघावं लागेल. चारचाकी टॅक्सीमध्ये मास्क न घातल्यास चालकासह प्रवाश्यालाही 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

बाहेर गावाला प्रवास करत असलेल्या नागरिकांसाठी संचारबंदीत सूट देण्यात आली असून वैध प्रवास तिकीट दाखवून त्यांना घरापासून ते बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन किंवा विमानतळापर्यंत किंवा तिथून परतीचा प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही.

थोडक्यात बातम्या

निर्बंध असतानाही कटिंगचं दुकान सुरू; पोलिसांनी केलेल्या मारहाणीत सलून व्यावसायिकाचा मृत्यू

‘राज्य सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करतंय’; पुण्याच्या महापौरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

संचारबंदीकाळात नागरिकांना प्रवासासाठी पास लागणार का? पोलीस महासंचालकांनी दिलं उत्तर…

ब्रीच कँडी रुग्णालयाच्या गेटवरून सुप्रिया सुळेंची ऑनलाईन सभा

बहुजन समाजाला वाहिलेली पहिली ई-कॉमर्स वेबसाईट सुरु, अनोख्या प्रयोगाला हवी तुमची साथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More