बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार घराण्याला महाराष्ट्र लुटायचा काय ठेका दिलाय का?”

मुंबई | राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील चार मोठ्या साखर कारखान्यांवर आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले आहेत. अजित पवारांचे नातेवाईक आहेत म्हणून जर आमच्या नातेवाईकांवर धाडी टाकल्या असतील तर, कोणत्या पातळीवर जाऊन यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. त्यामुळं राज्यातील जनतेने या सर्व घाणरड्या राजकारणाचा नक्की विचार करायला हवा, असं रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे. आता भाजप नेते किरीट सोमय्यांनी अजित पवारांवर टीकेचे बाण सोडले आहेत.

अजित पवार यांनी मागील काही महिन्यांपासून मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळाटाळ करत आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरा मालक कोण आहे? कोणी विकत घेतला? तसेच कारखाना किती रूपयांत विकत घेतला आहे, असं सोमय्यांनी म्हटलं आहे.

तुम्ही बेकायदेशीर कारभार केला आहे. जर तुम्ही आज म्हणत असाल माझे नातेवाईक, माझे लोक, माझा परिवार आहे. तर, राज्यातील जनता कोणाचा परिवार आहे? तुमच्या घराला काय ठेका दिला आहे का महाराष्ट्र लुटायचा? असा गंभीर सवाल सोमय्यांनी अजित पवारांना विचारला आहे.

दरम्यान, अजित पवारांना आता साखर कडू वाटायला लागली आहे. ज्यावेळी अजित पवारांनी शेतकऱ्यांच्या मेहनतीची कमाई घेतली, त्यांच्या जमिनी घेतल्या, भागीदार बनले होते. तेव्हा हजारो शेतकऱ्यांचे कारखाने आणि पवार परिवार लुटत होते. मात्र, त्यावेळेस अजित पवारांना त्यांचं कुटूंब आठवलं नाही. ज्या शेतकऱ्यांना मी भेटलेलो आहे, त्या सर्व शेतकऱ्यांना आमच्या जमिनी पवार कुटूंबासह राष्ट्रवादीनं बळकावल्या आहेत, असा आरोप सोमय्यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या –

नवज्योत सिंग सिद्धू 1000 गाड्यांच्या ताफ्यासह लखीमपूरला रवाना; युपीत तणावाचं वातावरण

भारतीय संघाच्या अडचणी वाढणार??, दुखापत असतानाही ‘हा’ खेळाडू खेळतोय आयपीएल!

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी अवघ्या 25 किलोमीटरसाठी वापरलं हेलिकॉप्टर

‘गर्दी वाढवण्यासाठी आम्हाला जबदस्तीने बोलवलं’; योगी आदित्यनाथांच्या कार्यक्रमातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

बाॅलिवूड स्टार ह्रतिक रोशनचा आर्यन खानला पाठिंबा, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More