Top News महाराष्ट्र मुंबई

रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका

Photo Credit- Facebook/Sharad Pawar

मुंबई | जेजुरी येथे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याच्ये अनावरण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं. या कार्यक्रमावेळी बोलताना पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून त्यांच्यावर भाजप नेत्यांनी जोरदार टीका केली आहे.

अहमदनगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुक्यातून जिथून रोहित पवार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमदार म्हणून जातात. त्या मतदारसंघामध्ये चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. वस्तुस्थिती अशी आहे की अहिल्यादेवी होळकर जन्म ज्या चौंडी गावामध्ये झाला ते गाव जामखेड मतदार संघात येतं. अहिल्यादेवी होळकरांचं जन्मस्थान असलेल्या मतदारसंंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी रोहित पवारांना मिळाली. मात्र पवारांनी रोहित पवारांच्या मतदारसंघात अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला असं म्हटल्याने त्यांच्यावर टीका होत आहे.

राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी केलेल्या या वक्तव्यावरून भाजप नेते राम शिंदेंनी त्यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे राजकारणात, लोकशाहीत अर्धशतक पूर्ण करणारे नेते आहेत. त्यांच्या तोंडातून जे वाक्य गेले ते अनावधानाने गेले असेल किंवा त्यांची जीभ घसरली असेल, असं म्हणत राम शिंदेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही यावरून शरद पवारांवर टीका केली आहे. यावर शरद पवार काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘अशा’ लोकांवर जबरदस्त दंड ठोठवायला हवा- मकरंद अनासपुरे

पूजा चव्हाण प्रकरणावर अनिल देशमुखांनी सोडलं मौन, म्हणाले…

व्हाॅट्स अॅप आणि फेसबुकला सुप्रिम कोर्टाचा धक्का

…नाहीतर शरद पवारांची जीभ घसरली असेल- राम शिंदे

21 वर्षीय दिशाला का केली अटक?; नेमके काय आहे टूलकिट प्रकरण?

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या