बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?- देवेंद्र फडणवीस

मुंबई | कोरोना महामारीमुळे यंदाच्या वर्षीही पायवारीवर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र राज्य सरकारच्या पायवारीच्या निर्बंधांना न जुमानता पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांना पिपंरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक! विठ्ठल-वारकरी यांचे नाते अवर्णनीय! श्रद्धा-परंपरांचे महत्त्व आहेच! बंडातात्या कराडकर यांना अटक करून सरकारने काय साधलं?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

काहीच मध्यम मार्ग नव्हता?, वारकर्‍यांचा असा अपमान?, थेट अटकेची कारवाई ही सर्वथा चुकीची आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी बंडातात्या कराडकर यांना ताब्यात घेतल्यानंतर दिघीजवळील संकल्प गार्डन मंगल कार्यालयात स्थानबद्ध केलं आहे. त्यानंतर या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दी जमू लागली असून भाजपचे आमदार महेश लांडगे त्यांच्या भेटीसाठी आल्याची माहिती समजत आहे.

थोडक्यात बातम्या- 

…तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता- अण्णा हजारे

आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर गजाआड

नाना पटोलेंच्या ‘त्या’ खळबळजनक पत्राबद्दल नितीन राऊतांचा मोठा खुलासा!

देशांतर्गत सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापार,वाचा आकडेवारी

‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता प्राचीन चौहानला तरुणीची छेड काढल्याप्रकरणी अटक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More