Valentines Day | व्हॅलेंटाईन डेला लोक सर्वाधिक काय खरेदी करतात? या प्रश्नाचे उत्तर देणे फारसे कठीण नाही. व्हॅलेंटाईन डेला प्रत्येकजण आपल्या जोडीदाराला खास वाटावे यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. त्यांना भेटवस्तू देतात. यामध्ये प्रत्येकाची स्वतःची पसंती असते. परंतु तरीही जुन्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की या दिवशी बहुतेक लोक विविध प्रकारची फुले, कंडोम, कस्टमाईज्ड दागिने आणि टेडीबियर इत्यादी खरेदी करतात. याशिवाय काही लोक रेस्टॉरंट किंवा कॅफेमध्येही आपला दिवस घालवतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी या वस्तू भेट म्हणून उत्तम पर्याय मानल्या जातात. (Valentines Day)
फुले आणि कंडोम आहेत लोकांची पहिली पसंती
व्हॅलेंटाईन डेला सर्वाधिक खरेदी केली जाणारी गोष्ट म्हणजे फुले. याशिवाय कंडोम आणि कस्टमाईज्ड दागिनेही या शर्यतीत पुढे आहेत.जर आपण गेल्या वर्षीची आकडेवारी पाहिली तर 2024 मध्ये व्हॅलेंटाईन डेला फुलांवर 2.6 अब्ज डॉलर्स (2.6 लाख कोटी रुपये) खर्च करण्यात आले होते. हा व्हॅलेंटाईन डेच्या एकूण खर्चाचा 39 टक्के वाटा होता. तर एका अहवालानुसार, 2023 मध्ये 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान कंडोमची विक्री सुमारे 30 टक्क्यांनी वाढली होती. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या ठीक एक दिवस आधी 13 फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय कंडोम दिवस देखील साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यासाठी लोक मोठ्या संख्येने कंडोम खरेदी करतात.
ऑनलाइन खरेदी करू शकता आपल्या पसंतीची भेट
फुले असोत किंवा टेडीबियर, कंडोम आणि चॉकलेट तसेच कस्टमाईज्ड दागिने, सर्व काही तुम्हाला ऑनलाइन मिळेल. इतकेच नव्हे तर तुम्हाला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर व्हॅलेंटाईन ऑफरचा लाभही मिळू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त Amazon-Flipkart, Meesho आणि Myntra वर ‘टुडे ऑफर्स’ मध्ये जाऊन तपासणी करावी लागेल. (Valentines Day)
व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने खास ऑफर
व्हॅलेंटाईन डेला इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर 40 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. Flipkart वरूनही तुम्ही जवळपास सर्व उत्पादनांवर उत्कृष्ट सवलत मिळवू शकता.
Title: What Do People Buy the Most on Valentines Day