बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ चित्रपटासाठी आमिर खानने चक्क 12 दिवस केली नव्हती अंघोळ!

मुंबई | सिनेसृष्टीतील कलाकारांच क्षेत्र जेवढं लख्ख दिसतं त्यापेक्षा जास्त मेहनत त्यांना चित्रपटांसाठी घ्यावी लागते. चित्रपटात काम करणारे कलाकार एखादी व्यक्तीरेखा हुबेहुब पार पाडण्यासाठी सगळे कष्ट घेतात, त्यासाठी हवी ती मेहनत घेताना दिसतात. अशाच एका चित्रपटाचा सीन खरा वाटावा म्हणून आमिर खाननं चक्क 12 दिवस अंघोळ केली नव्हती.

बॉलिवूड कलाकारांचं आयुष्य जितकं रॉयल असतं, त्यापाठीमागे तितकीच त्यांची मेहनतसुद्धा असते. बॉलिवूड अभिनेता आमिर खान म्हणूनच ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. आमिर खान आपल्या प्रत्येक चित्रपटासाठी प्रचंड कष्ट घेत असतो. आपल्या अभिनयापासून आपल्या लूकपर्यंत प्रत्येक गोष्टीवर आमिर बारीक लक्ष देतो. ‘गुलाम’ या चित्रपटासाठी सुद्धा त्यानं अशीच मेहनत केली होती.

‘गुलाम’ या चित्रपटाचा शेवटचा भाग चित्रित केला जाणार होता. या सीनमध्ये आमिर खानला मार खाऊन चेहरा पूर्ण खराब झालेला दाखवायचा होता. यामध्ये आमिरचा चेहरा पूर्ण उतरलेला दाखवायचा होता. म्हणूनचं सीन परफेक्ट व्हावा आणि तो अगदी खरा वाटावा, यासाठी आमिरने तब्बल 12 दिवस आंघोळ केली नव्हती. हे खरं आहे आमिरला 12 दिवस आंघोळ न करणं खुपचं कठीण होतं. त्याला त्याचा त्रास देखील होतं होता. मात्र आपला सीन परफेक्ट व्हावा म्हणून आमिरनं हे सुद्धा केलं होतं. म्हणूनचं त्याला बॉलिवूडचा मि. परफेक्शनिस्ट म्हणून ओळखलं जातं.

दरम्यान, आमिरने ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केल होतं. त्यानं अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसच आपल्या प्रत्येक चित्रपटातून एक नवा विषय हाताळला आहे. मग तारे जमीन पर असेल, पीके असेल किंवा अलीकडेच आलेला सिक्रेट सुपरस्टार. आमिरने ‘दंगल’ या चित्रपटासाठी तर मोठ्या प्रमाणात आपलं वजन वाढवलं होतं. आणि चित्रपटानंतर पुन्हा ते वजन कमीसुद्धा केलं होतं. तसच ‘धूम 3’ साठीसुद्धा आमिर खाननं अशीच मेहनत घेतली होती.

थोडक्यात बातम्या –

‘कोरोनाची तिसरी लाट आली तरी…’; उद्धव ठाकरेंचा उद्योजकांना सल्ला

‘महागाईच्या भडक्यात बेरोजगारीची लाट, लोकांना काम देण्याची गरज’; तज्ज्ञांचा गंभीर इशारा

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More