बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! अवघ्या 23व्या वर्षी ‘ही’ महिला आहे 11 मुलांची आई, 105 मुलांची अपेक्षा

नवी दिल्ली | आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक कोणतीही गोष्ट करण्यास तयार असतात. मात्र, काही लोकांच्या इच्छा या हैराण करुन सोडणाऱ्या असतात. अशीच एक हैराण करुण सोडणारी इच्छा रशियात राहणाऱ्या एका जोडप्याची आहे. रशियात राहणाऱ्या एका कोट्यधीश जोडप्याला तब्बल 105 मुलांची अपेक्षा आहे.

रशियात राहणारी 23 वर्षीय क्रिस्टीना ही एक गृहिणी आहे. तर क्रिस्टीनाचे 56 वर्षीय पती गॅलीप हे एक व्यावसायिक आहेत. या जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. या दोघांना जगातील सर्वात मोठं कुटुंब बनवायचं आहे.

क्रिस्टीना आणि गॅलीप या दोघांची सर्वात मोठी मुलगी विका ही 11 वर्षांची आहे. विका नैसर्गिकरित्या क्रिस्टीनापासून झाली आहे. तर इतर 10 मुले ही सरोगसीद्वारे झाली आहेत. 105 मुलांसह या जोडप्याला इतिहास घडवायचा आहे.

याविषयी बोलताना हे जोडपं म्हणालं की, 105 मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सरोगसीचा अवलंब करणार आहोत. आम्ही सरोगसीचे आणखी पर्याय शोधत आहोत. यासाठी लागणारा खर्च करण्याचीही आमची तयारी आहे. तसेच आम्ही सर्व बाळांची एकसारखी काळजी घेतो.

थोडक्यात बातम्या –

इलेक्ट्रिक कार घेणाऱ्यांना दीड लाखाची सूट, राज्याचं इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर

तुम्ही स्वतःला सावरा, बाकीची काळजी आम्ही घेऊ- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर; आजची रुग्णसंख्या वाचा एका क्लिकवर

“बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आम्ही सर्वजण तुमच्यसोबत”

जीव लावून लढला पण फक्त एका चुकीमुळं महाराष्ट्राच्या प्रवीणचं मेडल हुकलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More