बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! चक्क चिमणी करतीये स्केटिंग, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यातील काही मजेशीर असतात. तर काही प्रेरणा देणारे असतात. त्यात कधी-कधी पशु-पक्षांचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशात सोशल मीडियावर एका चिमणीचा व्हिडीओ सध्या खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, चिमणी ही शारीरिकदृष्ट्या खूपच नाजूक असते. तसेच तिचा आवाजही नाजूक आणि मधूर असतो. परंतू काय तुम्ही याआधी चिमणीला कोणता खेळ खेळताना पाहिलं आहे का?. नसेल तर मग आता पाहा.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चिमणी चक्क स्केटिंग करताना दिसत आहे. स्केंटिंग करणं जितक वाटतं तितकं सोपं नसतं. त्यासाठी संपूर्ण शरिराचा तोल सांभाळणं खूप आवश्यक आणि गरजेचं असतं. थोडा जरी आपला तोल गेला तरी आपण खाली पडू शकतो.

या व्हिडीओमध्ये एक पांढऱ्या रंगाची चिमणी एखाद्या रायडरसारखी स्केटिंग करत आहे. त्या व्हिडीओमध्ये लहान दोन रस्ते आहेत. त्यावर खेळण्यातली छोटी गाडी आहे. त्या गाडीवर उभी राहत ती स्केटिंग करते. त्यानंतर त्या रस्त्याच्या खाली एक रोड आहे. ती त्याठिकाणी जाऊन पुन्हा छोट्या गाडीवर उभी राहूते आणि स्केटिंग करते. चिमणीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केल आहे. तसेच हा व्हिडीओ आतापर्यंत खूप लोकांनी पाहिला असून, अनेकांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंटही केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

8 वर्षाच्या प्रेमात मिळाला धोका, त्यानंतर प्रियकराने जे केलं ते पाहून पोलिसही चक्रावले

‘संबित पात्रा म्हणजे गटारीतला कीडा’; लाईव्ह कार्यक्रमात काँग्रेस प्रवक्त्या भडकल्या

“अर्थमंत्रालयात कमी IQ वाले लोक, मोदींना तर अर्थव्यवस्थाच समजत नाही”

नितीन गडकरी म्हणजे चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस- अशोक चव्हाण

“चंद्रकांत पाटलांनी छत्रपतींना उपकाराची आठवण करुन दिली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More